लोहारा , दि.७ : 
लोहारा तालुका संभाजी ब्रिगेड च्या वतीने  पदाधिकाऱ्यांनी मराठा आरक्षणा बाबत रोष व्यक्त करीत डोक्याचे मुंडण करून  मराठा समाजाला सरसकट ओबीसी अंतर्गत आरक्षण लागू करण्याकरिता लोहारा  तहसीलदार यांच्या मार्फत मुखमंत्री यांना  निवेदन देण्यात आले आहे.

     
लोहारा  तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनामध्ये सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला दिलेले एस इ बी सी वर्गातील आरक्षण रद्द केले आहे.. हा निकाल सर्वस्वी दुर्दैवी व मराठा समाजावर सर्वार्थाने अन्याय करणारा आहे.


 मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण लागू न करता वेळोवेळी सर्वच राजकीय पक्षांच्या सरकारांनी मराठा समाजाला असंवैधानिक श्रेणीतील आरक्षण लागू केले. आणि मराठा समाज व मराठा संघटनांना झुलवत ठेवले . मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसली आहेत . मराठा समाजासाठी टीकणारे कायदेशीर सरसकट ओबीसी आरक्षण लागू करावे ,  शासनाने आपल्या संवैधानिक चौकटीत राहून न्यायाधीश गायकवाड आयोगाच्या अहवालानुसार मराठा समाजाला सरसकट ओबीसी अंतर्गत आरक्षण लागू करावे, तातडीने मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात यावा .अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 


 या प्रसंगी लोहारा तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने डोक्याचे मुंडण करून नायब तहसिलदार  रणजित शिराळकर  मार्फत निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष शरद पवार, जिल्हा सचिव आशिष पाटील, लोहारा तालुकाध्यक्ष धनराज बिराजदार, बालाजी यादव, महादेव मगर, उपस्थित होते.
    यावेळी पोलिसांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना कायदा  व सुव्यवस्था चिगळू नये यासाठी लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धरमसिंह चव्हाण, पोलीस कर्मचारी एस एस पांचाळ अन्नपूर्णा कुंभार,  जावेद जेवळे ,हाजीलाल मोमीन यांनी वेळीच ताब्यात घेऊन सोडून दिले.
 
Top