काटी, दि.०४ उमाजी गायकवाड
 तुळजापूर तालुक्यातील काटी येथे  मंगळवार  दि. 4  रोजी सकाळी 9 वाजता संध्या मुंबईत वास्तव्यास असलेले तथा काटी येथील रहिवासी  बापू  बाळा नारायणकर  निवृत्त सहसचिव मंत्रालय, मुंबई  यांच्या वतीने पत्रकार उमाजी गायकवाड यांच्या मार्फत ग्रामस्थांना 1200 मास्कचे  वाटप सरपंच आदेश कोळी, चेअरमन विक्रमसिंह देशमुख, उपसरपंच सुजित हंगरगेकर आदी मान्यवरांच्या हस्ते दहा  लोकांना प्रातिनिधिक स्वरूपात देऊन बाकीचे घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले. 

मागील वर्षी बापु नारायणकर यांनी 29 एप्रिल 2020 रोजीही गावातील 18 गरजू, अपंग, वृध्द,विधवा, हातवर पोट असणाऱ्या  कुटुंबांना 15 दिवस पुरेल एवढे किराणा साहित्याच्या किटचे वाटप  केले होते. 

कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या व नुकतेच गावातील सात लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने   कोरोनाच्या या संकट काळात आणि लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर जन्मभूमी काटी गावातील नागरिकांना कोरोनाविरुध्दच्या लढाईत ग्रामस्थांसाठी आपलाही छोटासा वाटा असावा या उदात्त हेतूने व गावाविषयी वाटणाऱ्या आत्मियतेने मुंबईत राहूनही सामाजिक व मानुसकिच्या भावनेतून व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  गावाविषयी वाटणाऱ्या काळजीपोटी 
सामाजिक कार्याची आवड असणारे सेवा निवृत्त सहसचिव मंत्रालय, मुंबई तथा काटीचे सुपूत्र बापू बाळा नारायणकर यांनी ग्रामस्थांना 1200 मास्कचे वाटप केले. 

त्यांच्या या कार्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
    यावेळी सरपंच आदेश कोळी, चेअरमन विक्रमसिंह देशमुख, सुजित हंगरगेकर,व्हाइस चेअरमन भागवत गुंड, प्रदिप साळुंके, सुर्यभान हंगरकर,   पत्रकार उमाजी गायकवाड, माजी सरपंच अशोक जाधव, धनंजय देशमुख, मकरंद देशमुख,करीम बेग, जितेंद्र गुंड, अहमद पठाण, माजी सैनिक श्रीकांत गाटे, नानासाहेब सोनवणे, बाबा सोनवणे, धनाजी गायकवाड, बाळासाहेब मासाळ, अनिल बनसोडे, मोहन शिंदे, रावसाहेब गुंड आदी मान्यवर उपस्थित होते
 
Top