चिवरी,दि.२६ :
तुळजापूर तालुक्यातील उमरगा चिवरी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात सोमवारी दि.२४ रोजी उमरगा चिवरी, हिप्परगा, येवती, चिवरी येथील ४५ वर्षा पुढील नागरिकांचे १५० लसीकरण करण्यात आले.
लसीकरण मोहीमेत अणदुर येथील वैद्यकीय अधिकारी डाॅ. मल्लिनाथ स्वामी ,आयसीडीएस सुपरवायझर दलभंजन , आरोग्य सेवक निखिल डांगे, सरपंच स्वाती दूधभाते, उपसरपंच आण्णाराव कदम ग्रामसेवक गोरोबा गायकवाड, पोलीस पाटील योगेश बिराजदार ,महेश पाटील, आशा कार्यकर्ते अनिता भोसले, परिचारिका सुनीता माने, पवार, अंगणवाडी कर्मचारी, शिक्षक आदींनी परिश्रम घेतले.