तुळजापूर , दि.२७ : 
शासनाने शेतकऱ्यांना  तात्काळ पीक विमा वितरित करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देवराज मिञमंडळाने तुळजापूर तालुका कृषी अधिकारी यांना  निवेदनाव्दारे दिला आहे. 

  गतवर्षी अतिवृष्टीने झोडपून काढल्याने खरीप पीकांचे मोठे नुकसान झाले असून, पिक कापणी अहवाल तसेच आणेवारी ५० पैशाचा आत असल्याने   उस्मानाबाद व तुळजापूर  तालुक्यातील शेतक-याना खरीप पिक विमा तातडीने वितरित करण्याची मागणी देवराज मित्र मंडळाने केली आहे.  निवेदनावर तालुका अध्यक्ष  ॲड उदय भोसले यांची स्वाक्षरी आहे. 

 
Top