जळकोट, दि.२ :  
जळकोट  ता. तुळजापूर येथील मुंबई - हैदराबाद महामार्गावरील १९७६ पासून भोजनाची सेवा देणारे वीरभद्रेश्वर भोजनालयाचे मालक सुरेश इराप्पा मुडबे यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने   राहत्या घरी निधन झाले. रात्री दहा वाजता त्यांच्यावर स्वतःच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.

 त्यांच्या पश्चात पत्नी,१ बहिण,६ मुले,५ मुली, जावई, सुना , नातवंडे असा मोठा परिवार आहे. 

राष्ट्रीय महामार्गावरुन   प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुरेश मुडंबे यानी रात्रंदिवस भोजनाची सेवा देत असत. वीरभद्रेश्वर भोजनालय  हे नाव त्यांनी दूरवर पोहोचवले आहे.
 
Top