काटी,दि.०२ :
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील जेष्ठ नागरिक शिवाजी व्यंकटराव देशमुख वय ८४ यांचे रविवार दि. २ मे रोजी पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान कोरोनामुळे निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर तुळजापूर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यामार्फत त्यांच्या शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
रावसाहेब देशमुख व प्रभाकर देशमुख यांचे ते वडील होत. आठवडाभरातील काटी येथील कोरोनाचा हा पाचवा बळी आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.