जळकोट,दि. २ :मेघराज किलजे
जळकोट ता.तुळजापूर येथे कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी ग्रामपंचायती च्यावतीने करण्यात आली आहे.
जळकोट प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत हंगरगा ( नळ) बोरगाव, नंदगाव, सलगरा (मड्डी), सिदंगाव, कुन्सावळी, आलियाबाद, रामतीर्थ, आदि गावांचा समावेश आहे.जळकोट गावची लोकसंख्या जास्त आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे.
कोरोनाच्या या महामारीत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कोविड पाॅझिटि्व्ह साधारण पेशंटसाठी जळकोट येथे कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण, सरपंच अशोकराव पाटील यांनी केली होती.
या मागणीला तात्काळ प्रतिसाद देत तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे यांनी जळकोटला भेट देऊन येथील जिल्हा परिषद शाळेच्या खोल्यांची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.तसेच
कोविड सेंटरसाठी काय - काय उपाय योजना करायच्या त्यासाठी सुचना केल्या. यावेळी तहसीलदार सौदागर तांदळे, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, सरपंच अशोकराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सहचिटणीस महेश कदम ,मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे, लोहगावचे माजी सरपंच भिवाजी इंगोले, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सुनील माने, शिवराम कदम, प्रविण कदम, लहु कार्ले , विशाल जाधव ,वैद्यकीय अधिकारी डॉ. विष्णू सातपुते आदी उपस्थित होते.