चिवरी,दि.०२ :
तुळजापूर तालुक्यातील उमरगा चिवरी येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने कोरूना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावामध्ये जंतुनाशक औषध फवारणी करण्यात आली.
गावात आणि घरात स्वच्छता राखावी हात धुण्यासाठी सॅनिटायझर व साबणाचा वापर करावा, बाहेरचा संपर्क टाळावा, मास्कचा वापर करावा,आदींसह आरोग्यविषयक जनजागृती करण्यात आली.
यावेळी सरपंच स्वाती दुधाभाते, उपसरपंच आण्णाराव कदम, ग्रामसेवक गोरोबा गायकवाड, ग्रामपंचायत कर्मचारी सोपान सावंत, गोरख बोराडे, बिरू दूधभाते, आरोग्य सेवक निखिल डांगे, आशा कार्यकर्त्या अनिता भोसले, पोलीस पाटील महेश पाटील आदींनी सहभाग नोंदवला होता.