चिवरी,दि.०१
तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे ग्रामपंचायत च्या वतीने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. तसेच गावात जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे.
यावेळी सरपंच अशोक घोडके, उपसरपंच बालाजी पाटील, ग्रामसेवक गोरोबा गायकवाड, पोलीस पाटील योगेश बिराजदार, ग्रामपंचायत कर्मचारी धनाजी कोरे,कल्याण स्वामी, आशा कार्यकर्त्या अर्चना राजमाने, रोजगार सेवक तानाजी जाधव आदींनी सहभाग नोंदवला होता.