तुळजापूर, दि. ३१ :
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी सामाजिक सुधारणेसाठी मोलाचे कार्य केले, त्यांच्याच प्रेरणेने तुळजाभवानीचे तीर्थक्षेत्र असणाऱ्या तुळजापूर शहरांमध्ये त्यांनी तुळजाभवानी देवीच्या भक्तांसाठी अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने विहीर बांधली. आजही अहिल्याबाई होळकर यांच्या विचारांची साक्ष देत दिमाखात असल्याचे उदगार काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमर मगर यांनी काढले.
तुळजापूर शहरातील काँग्रेस कार्यालयात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली . या निमित्ताने सर्व कार्यकर्त्यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
यावेळी उपस्थित मान्यवर काँग्रेस तालुकाध्यक्ष अमर मगर , काँग्रेस नेते रणजित इंगळे, उद्योजक आनंद जगताप, विशाल भांजी, भास्करराव क्षिरसागर ( बारुळ ), सुरेश कोकरे, ( कोरेवाडी ), प्रहार क्रांति संघटना जिल्हा सचिव महादेव चोपदार, विकास तांबे , मारुती पवार , तालुका उपाध्यक्ष दिनानाथ दिक्षीत , दिपक थोरात, उमेश पैलवान यांची उपस्थिती होती. अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन तालुका अध्यक्ष अमर मगर यांनी केले. कोरोनामुळे नियमाचे पालन करुन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.