संसर्गजन्य कोरोना साथीच्या वाढत्या प्रादुर्भावाममुळे जिल्हाधिकारी यांनी लाँकडाऊन काळात अत्यावश्यक सुविधा असलेल्या किराणा दुकानदाराना सकाळी ७ ते ११ या वेळेत दुकान उघडे ठेवण्यास परवानगी दिली.
माञ सकाळी किराणा साहित्य खरेदी करण्यासाठी किराणा दुकाना समोर ग्राहकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे.माञ दुकानदाराकडे पुरेशा वेळ नसल्यामुळे लाँकडाऊन काळात ही दुकानासमोर झालेल्या गर्दीचा शारिरीक अंतराकडे कान डोळा करीत आपला व्यापार करण्यात मग्न आहेत.
त्यामुळे संसर्गजन्य कोरोना वाढत्या धोक्याचे गांभीर्य लक्षात घेऊन व्यवस्थितरित्या व्यापार करावा असे असताना शारिरीक अंतराचा माञ फज्जा उडाल्याचे दिसुन येत आहे.
व्यापारी वर्गानी किराणा माल घेण्यास येणाऱ्या ग्राहकांना दोन व्यक्तीमधील अंतराचे महत्त्व पठवुन सांगावे. दुकानासमोर झालेल्या गर्दी बाबतीत व्यापारी वर्गानी भान ठेवले पाहिजे.
तुळजापुरात शारिरीक अंतराचा सध्या किराणा दुकाना समोर फज्जा उडत आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तुळजापुरात किराणा दुकानदार व्यापारी वर्गाकडून प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात येत आहे.
आतुन किर्तन बाहेरुन तमाशा,असाही गोरख धंदा कांही दुकानदाराकडुन केला जात आहे.तरी संबंधित प्रशासकीय यंञणेकडून वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. सर्व सामान्य दुकानदार यांच्या दुकानास प्रशासकीय यंञणेकडून टाळे ठोकले जाते? मग या बड्या धेंड्याच्या दुकानादाराकडे संबंधित प्रशासना कडून दुर्लक्ष का? केले जाते असा दुजाभाव प्रशासकीय यंञणेकडून होत आहे .तरी संबंधित प्रशासकीय यंञणेकडून शहरात बड्या धेंड्याच्या किराणा दुकाना समोरीलचा फज्जा उडत चाललेला आहे . याबाबत शहरवासियामध्ये चर्चा रंगली आहे.