तुळजापूर दि १२ : डॉ. सतीश महामुनी

 रमजानचा महिना हा पवित्र मुस्लिम बांधवांचा सण आहे. या आपत्तीच्या काळात अडचणीत असलेल्या मुस्लीम समाजाला माजी नगराध्यक्ष सौ अर्चना विनोद गंगणे यांच्यावतीने किराणा साहित्य वितरित करण्यात आले. या निमित्ताने मुस्लिम बांधवांनी गंगणे परिवाराच्या या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले.


रमजान  निमित्त संपूर्ण महिना १३ एप्रिल ते १४ मे हा संपूर्ण महिना जिजामाता नगर मधील मुस्लिम बांधवांना ईद निमित्त दररोज घरोघरी जाऊन फळ, व भोजन,  जिलेबी ,लाडू ,,बालुशाही असे वेगवेगळे पदार्थ दररोज घरोघरी जाऊन वितरण करण्यात आले.

 त्याचबरोबर दि. १२ मे रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता युवा नेते  विनोद  गंगणे, माजी नगराध्यक्ष सौ अर्चना विनोद गंगणे यांच्यातर्फे  जिजामाता नगर मधील जवळपास ६० ते ७० मुस्लिम कुटुंबीयांना किराणाचे  साहित्य  वाटप करण्यात आले.

यावेळी   शहर व  तालुक्यातील मुस्लिम बांधवांना रमजान सणाच्या   गंगणे परिवार  , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय गंगणे यांनी आपल्या  शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी उपस्थित सौ अर्चना विनोद गंगणे , सौ.प्रियांका विजय गंगणे व कुटुंबीय उपस्थित होते. प्रभागातील
कार्यकर्ते  संतोष इंगळे ,  किरण जाधव इत्यादीजण उपस्थित होते.
 
Top