महामार्गावर दरोड्याच्या तयारीत असलेल्या  6 आरोपींना रंगेहाथ पकडले.  

 वाशी, दि. 12 :   उस्मानाबाद जिल्ह्रयातील वाशी पोलिस ठाण्याच्या हद्दीत महामार्गावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेलया सहा जणांना रात्री गस्त घालणा-या पोलिस पथकाने रंगेहाथ पकडले. 


 वाशी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजीनाथ काशीद हे पथकासह मंगळवार दि. 11 मे  रोजी 03.45 वाजता  शासकीय वाहनाने विभागीय रात्र गस्त करत होते. यावेळी त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वरील इंदापूर फाटा येथे काही व्यक्तींच्या संशयास्पद हालचाली दिसत आहेत. यावर पथकाने तेथे जाउन खात्री केली असता त्या ठिकाणी अनिल शिंदे, रा. खामकरवाडी , माहन काळे , बापू शिंदे, पिंटु शिंदे,  विक्रम शिंदे , रविंद्र शिंदे,  सर्व रा. नांदुर (घाट), ता. केज हे तीन मोटारसायकलीसह आढळले. पथकाने त्यांची वाहनांसहीत झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात लोखंडी कोयता, बतई, लोखंडी गज व नळी, मिरची पुड, दोरी असे साहित्य आढळले. त्या ठिकाणी हजर असल्याबाबत त्यांना विचारपुस केली असता ते सर्व पोलीसांना समाधानकारक माहिती देऊ शकले नाहीत.

 यावर ते सर्व महामार्गावरील वाहनांवर दरोडा टाकण्याच्या किंवा लुटमार करण्याच्या तयारीने एकत्र जमले असल्याचा पोलीसांचा संशय बळावल्याने त्या सर्वांना नमूद साहित्य व चार मो.सा. समवेत ताब्यात घेउन त्यांच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 399, 402 अंतर्गत गुन्हा नोदवला आहे.

 
Top