नळदुर्ग ,दि.२२ : 
बाहेरगावी गेल्याची संधी साधुन घराच्या पाठी मागील दरवाजा अज्ञात चोरट्यानी तोडुन घरातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असे मामिळुन जवळपास एक लाखाच्या ऐवजावर मारला डल्ला.


 रेखा विलास देशमुख, रा. नळदुर्ग, ता. तुळजापूर या कुटूंबीयांसह दि. 20- 21.05.2021 रोजी दरम्यान बाहेर गावी गेल्या होत्या. दरम्यानच्या काळात त्यांच्या घराचा पाठीमागील दरवाजा अज्ञात व्यक्तीने तोडून आतील 8 ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने- वस्तू व 50,000 ₹ रोख रक्कम असे साहित्य चोरुन नेले. अशा मजकुराच्या रेखा देशमुख यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
 
Top