नळदुर्ग, दि.१३ : कोर्टात दिलेली तक्रार मागे घेण्याच्या कारणावरुन नळदुर्ग येथील 1)सय्यद कौसर जहागीरदार 2)सय्यद कैसर जहागीरदार 3)सय्यद अजहर जहागीरदार यांनी भाऊ- सय्यद अफसर मजहर जहागीरदार यांना दि. 12.05.2021 रोजी 03.00 वा. सु. नळदुर्ग येथील जामा मस्जिद जवळ शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गजाने मारहाण करुन जखमी केले व तक्रार मागे न घेतल्यास ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सय्यद अफसर जहागीरदार यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
तर दुसऱ्या घटनेत सय्यद अमीर अजहर जहागीरदार हे दि. 12 मे रोजी 16.00 वा. सु. आपल्या घरासमोर असतांना नातेवाईक- 1)सय्यद अफसर जहागीरदार 2)सय्यद अजहर जहागीरदार 3)सय्यद जुनेद जहागीरदार यांनी नळदुर्ग बंधारा क्र. 2 कामी संपादीत जमीनीच्या मोबदल्याच्या कारणावरुन सय्यद अमीर यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगड, काठीने मारहाण करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सय्यद अमीर जहागीरदार यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.