लोहारा,दि.२७ :
शहरामध्ये पोलीसाच्यावतीने गेल्या आठवडाभरापासून कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आपल्या जिवाची पर्वा न करता शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकासह इतर ठिकाणी तटस्थ पहारा देत मोटार कायद्याअंतर्गत व कोविड १९ चे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.
आज दुपारपर्यंत जवळपास 31 जनावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
तालुक्यामध्ये कोरोना संसर्ग आजाराचे रुग्ण कमी, अधिक होत आहेत तर या संसर्ग आजाराचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी महसूल प्रशासनाचे तहसीलदार संतोष रुईकर आरोग्य प्रशासनाचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. गोविंद साठे , पोलीस निरीक्षक धरमसिंग चव्हाण पोलीस उपनिरीक्षक आनंदराव वाठोरे नगरपंचायत प्रशासनातील मुख्याधिकारी गजानन शिंदे अधीक्षक जगदीश सोंडगे तसेच सफाई कामगार आशा कार्यकर्ती तळमळीने या संसर्ग आजाराचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपले कर्तव्य बजावीत आहेत .
अशा भीषण संकट काळामध्ये मात्र पोलिस प्रशासन कोरोना संसर्ग आजाराच्या पार्श्वभूमीवर लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात नियमाचे उल्लंघन करीत मोकाट फिरणाऱ्या दुचाकीस्वारावर दंडात्मक कारवाई लोहारा पोलिस ठाण्याच्या वतीने करण्यात येत आहे.
या कारवाईमुळे मात्र मोकाट फिरणाऱ्यांच्या संख्येमध्ये घट झाले असल्याचे दिसून येत आहे.
दि. 27 मे रोजी पोलीस उपनिरीक्षक आनंद वाठोरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी होमगार्ड यांनी सकाळपासूनच छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोकाट व विना मास्क फिरणाऱ्या दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई केली आहे. तर यामध्ये दुपारपर्यत मोटार दंड कायद्याअंतर्गत व उल्लंघन करणाऱ्या 31 जणांवर कार्यवाही करीत दंडात्मक रक्कम जवळपास सहा हजार रुपये वसूली करण्यात आली आहे.