वागदरी,दि.२७ :
जागतिक पातळीवर शांतता प्रस्थापित करून समाधानाने आनंदी व निरोगी जिवन जगण्यासाठी मानवाने तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी सांगितलेल्या पंचशील तत्वाचे पालन करावे असे प्रतिपादन रिपाइंचे (आठवले ) जिल्हा सचिव एस.के.गायकवाड यांनी येथे बोलताना केले.
पंचशील बुद्ध विहार कमिटी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती वागदरी ता.तुळजापूर येथे बुद्ध जयंती निमित्ताने आभिवादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी एस.के गायकवाड हे बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून सामुदायिकरित्या बुद्ध वंदना घेण्यात आली.
यावेळी उपसरपंच मुक्ताबाई वाघमारे, ग्रा.प.सदस्य रावसाहेब वाघमारे, चंद्रकांत वाघमारे, अनिल वाघमारे, महादेव वाघमारे, राजेंद्र वाघमारे, शिवाजी वाघमारे, सादु वाघमारे, सुर्यकांत वाघमारे, अंबादास झेंडारे, वालमिक वाघमारे,लक्ष्मण झेंडारे, काशिनाथ वाघमारे, शेखर बनसोडे, हणमंत वाघमारे, भारत वाघमारे,बाळू कांबळे यासह महिला उपस्थित होत्या.