तुळजापूर , दि.२७ :
जिल्हयातील सार्वजनिक दुकानांची वेळा अकरा ऐवजी वाढवुन दोन वाजेपर्यंत करुन व्यापारी, नागरिक कामगारांना दिलासा देण्याची मागणी भष्ट्राचार निमुर्लन समितीच्यावतीने तुळजापूर तहसिलदार मार्फत उस्मानाबाद जिल्हाधिकारी याना गुरुवार दि. २७ मे रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना पार्श्वभूमीवर पुकारलेल्या लाँकडाऊनमुळे व्यापारी, कामगार वर्ग अर्थिक संकटात आला असुन त्यामुळे दुकाने उघडण्यात शिथिलता देवुन सकाळी सात ते अकरा ऐवजी यापुढे सात ते दोन वाजेपर्यंत दुकाने उघडे ठेवण्यास परवानगी देण्याची मागणी करण्यात आली. या निवेदनावर जिल्हाअध्यक्ष अँड धीरज जाधव व तुळजापूर तालुकाध्यक्ष विजय भोसले यांच्या सह्या आहेत.