अणदूर,दि.१३ : 
 तुळजापूर तालुक्यातील  खुदावाडी ग्रामपंचायत कार्यालय  व ग्रामस्थांच्या सहकार्यातून खुदावाडी गावात 1 हजार 300 वृक्षांची लागवड 4 महिन्यापूरवी करण्यात आली होती. त्यातील जवळपास 90 टक्के वृक्ष हे सद्यस्थितीत उत्तमरित्या जगली  व वाढली आहेत. त्यामुळे गाव निसर्गमय झाले आहे.


ग्रामस्वच्छता अभियानात द्वितीय क्रमांक प्राप्त झालेल्या व सतत गावात सामाजिक कार्यात तत्पर असणाऱ्या खुदावाडी येथील सरपंच शरद नरवडे, उपसरपंच पांडुरंग बोगरगे, ग्रामसेवक महेश मोकाशे , सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या संकल्पनेतून 4 महिन्यांपूर्वी विविध जातीच्या जवळपास 1300 वृक्षांची लागवड करण्यात आली होती. 

ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नातून यातील 90 टक्के  झाडे ही चांगली जगली व वाढली आहेत.
 गावात प्रवेश करताना गेटच्या कमानीच्या दोन्ही बाजूला, जिल्हा परिषद शाळा परिसर, मारुती मंदिर परिसर, काटे यांच्या घरापाठीमागे, सोसायटी व पाटील तांडा जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस , सांस्कृतिक सभागृह परिसर, मातंग वस्ती परिसर व संपूर्ण गावात हे वृक्षारोपण करण्यात आले होते. सगळ्याच झाडांना ट्री गार्ड , ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील तरुण मंडळी हे दररोज झाडांना पाणी घालत त्यांची निगा राखत त्यामुळे ही झाडे बहरदारपणे वाढत आहेत व गाव निसर्गमय  झाले आहे. प्रत्येक ट्री गार्ड वर वृक्षवल्ली आम्हा सोयरे, झाडे लावा झाडे जगवा , प्रत्येकांनी 1 तर झाड लावलाच पाहिजे ,जेणेकरून ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही.

झाडाचे  महत्व  जाणून खुदावाडी ग्रामपंचायतींनी केलेले वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन परिसरातील गावांना एक संदेश देत आहे. या प्रमाणे प्रत्येक गावात वृक्षारोपण झाल्यास निसर्गाचा समतोल राखण्यास फार मोठी मदत ठरणार आहे. याकामी स्वप्नील टिकम्बरे, पांडुरंग व्हलदुरे हे झाडाला पाणी घालण्यापासून त्यांची निगा राखण्याचे काम करत आहेत, तर गावातील सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती व गावातील इतर अनेक नागरिकांनी  यासाठी आर्थिक मदत केली आहे, 

श्रीधर नरवडे, वसंत
 कबाडे, आकाश सालेगावे,भास्कर व्हलदुरे, केशवराज बोगंरगे, शशिकांत कबाडे,शशिकांत सांगवे आदी तरुण मंडळीसह ग्रामस्थ वृक्ष संवर्धनासाठी मदत करीत आहेत.
 
Top