उमरगा ,दि.१३
 श्रीकृष्ण महाविद्यालय गुंजोटी ता. उमरगा येथिल सन 2012 बँचच्या विद्यार्थ्यांनी   कै.बाळासाहेब ठाकरे कोविड सेंटर मधील रुग्णांना मदत म्हणुन फळे वाटप केले.


सध्याच्या काळात आपापल्या परीने जमेल तशी एकमेकांची मदत केली तर कोरोनासारख्या गंभीर समस्येवर आपण मात करू शकतो, हे वेळोवेळी अनेकजण पटवून देत आहेत. 


सर्वसामान्यांपासून सधनमाणसा सोबत अनेकजण या मदतीत खारीचा वाटा उचलत आहेत. यामध्ये माजी विद्यार्थी सुद्धा गरजूंच्या मदतीसाठी पुढे सरसावली आहेत. सकस आहार म्हणून 200 कलिंगड व 2 चुरमुरे बॅग माजी विद्यार्थी यांच्या कडून भेट देण्यात आले.  

कोरोनाच्या या महासंकटात बाहेर सर्वच गोष्टींची टंचाई निर्माण झाली आहे. या कठीण काळात आपल्या लोकांना आपली गरज आहे. आपण प्रत्येकजण या समाजाचे काहीतरी देणे लागतो. या भावनेतून जमेल तशी मदत करा. नक्कीच पुण्य मिळेल. आम्हीही शक्य ती आणि शक्य त्या ठिकाणी आमचं कर्तव्य पार पाडीत आहोत. असे सांगितले .

तुम्हीही यामध्ये सहभागी व्हा.....2012 बॅच श्रीकृष्ण महाविद्यालय गुंजोटी
 
Top