तुळजापूर, दि. १३ : डॉ. सतीश महामुनी

कोरोना आपत्तीमध्ये अडचणीत सापडलेल्या कुटुंबांना मदत करणे अत्यंत मोलाचे कार्य आहे, काँग्रेसचे  नगरसेवक सुनील रोचकरी यांनी प्रभाग क्र. ४ मधील कुटूंबांना किराणा साहित्य किट वितरित करण्याचा  स्तुत्य  उपक्रम घेत आहेत अशा शब्दात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज पाटील यांनी नगरसेवक सुनिल रोचकरी यांच्या कामाचे कौतुक केले.


तुळजापूर नगरपरिषद प्रभाग क्रमांक चार मधील कुटुंबांना या प्रभागाचे नगरसेवक सुनील रोचकरी यांच्यावतीने किराणा साहित्याचे किट तालुक्याचे तहसीलदार सौदागर तांदळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज पाटील, तालुका अध्यक्ष अमर मगर, जिल्हा प्रवक्ते अनंत कोंडो, तुळजाभवानी पुजारी मंडळ अध्यक्ष सज्जन साळुंके, युवक नेते अण्णासाहेब अमृतराव यांच्या हस्ते सदर कुटुंबाना वितरीत करण्यात आले. 

कार्यक्रमास काँग्रेसचे कार्यकर्ते लखन पेंदे, सुहास गायकवाड ,करण साळुंके, शिवाजी अमृतराव, राहुल भालेकर, सचिन सुरवसे, बंटी कदम, अक्षय सुरवसे, सुदर्शन वाघमारे, राहुल जटाळ, अभिषेक साळुंखे, नंदू लसने यांची उपस्थिती होती. 

सुनील चव्हाण विचार मंचच्या वतीने प्रभाग क्रमांक चार मधील नागरिकांना या प्रभागाचे नगरसेवक सुनील रोचकरी सातत्याने मदत करण्यासाठी पुढाकार घेतात. गेल्या पाच वर्षापासून या प्रभागातील नागरिकांना शुद्ध पाणी मोफत त्यांच्या वतीने दिले जाते. याशिवाय वेळोवेळी आपत्कालीन परिस्थितीमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून ते आपलं कर्तव्य बजावताना लोकांना मदतीसाठी पुढाकार घेतात.



उस्मानाबाद जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण आणि युवक नेते सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारण आणि समाजकारण केली जाते. आडचणीच्या काळात कार्यकर्त्यांनी जनतेच्या मदतीला धावून जाण्याचे आदेश  दिल्यामुळे  काँग्रेस कार्यकर्ते लोकांना मदत करण्यात पुढाकार घेत आहेत अशी माहिती नगरसेवक सुनील रोचकरी यांनी दिली .
 
Top