नळदुर्ग , दि.२४ : 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नळदुर्ग  शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहरातील कोविड केअर सेंटर मधील रुग्णाना फळे, पाणी बॉटल  तर  आरोग्य कर्मचाऱ्यांना   सॅनिटायझर देण्यासाठी केंद्र प्रमुख यांच्याकडे वरील साहित्य सोपविण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उस्मानाबाद  जिल्हा सचिव ज्योतीबा येडगे, शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी, मनविसे शहराध्यक्ष सूरज चव्हाण, शहर सचिव आवेज इनामदार, संदीप वैद्य, अरबाज शेख यांच्यासह कोविड केअर सेंटर मधील स्टाफ उपस्थित होते.
 
Top