नळदुर्ग, दि.२९ :
शहरातील वसंतनगर येथिल ओंकार मंडप काॕन्ट्रक्टरचे मालक पांडूरंग दासु चव्हाण वय ४५ वर्ष यांचा अल्पशा आजाराने तुळजापूर येथिल रुग्णालयात शनिवारी पाहटे उपचारादरम्यान मृत्यु झाले आहे. त्यांच्या पश्चात वडिल, भाऊ,पत्नी,दोन मुले,दोन मुली असा परिवार आहे.
मयत पांडुरंग चव्हाण हे नळदुर्ग व परिसरात मडंप व्यवसायिक म्हणुन सर्वञ परिचीत होते. चव्हाण यांच्या आकाली निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. विविध मंडळाचे पदाधिकारी,कार्यकर्ते , बंजारा भजनी मंडळाकडुन श्रध्दाजली वाहण्यात आली.