सलगरा (दि.) दि.२९ :
येथील ग्रामदैवत श्री शंभु महादेवाची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्याने साध्या पद्धतीने आणि परंपरा कायम राखत धार्मिक विधी उरकण्यात आले..
याञेदिवशी श्री शंभु महादेवाचे धार्मिक विधी व पारंपरिक पूजाविधी करण्यात आले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने गर्दी टाळण्यासाठी आणि भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून यात्रा साध्या पद्धतीने होणार असल्याचे उपसरपंच प्रशांत लोमटे तसेच यात्रा कमिटीच्या वतीने पत्रकार प्रतिक भोसले यांना सांगण्यात आले होते.
तसेच यात्रे मध्ये कोणत्याही प्रकारच्या शासकीय नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी सरपंच विष्णु वाघमारे, उपसरपंच प्रशांत लोमटे, माजी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रभाकर मुळे, दाजी लोमटे, दशरथ लोमटे, महावीर लोमटे, प्राध्यापक अनिल लोमटे, श्रीकांत लोमटे आदींनी परिश्रम घेतले.