तुळजापूर, दि. २९ : डॉ. सतिश महामुनी

खरीप हंगाम  बियाणे पेरणी पुर्वी क्षमता तपासावी, याचे प्रात्यक्षिक दहिवडी ता. तुळजापूर येथे शुक्रवार  दि.२८ रोजी पार पडले, शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने महत्त्वाच्या सूचना शेतकऱ्यांना  यंत्रणेमार्फत करण्यात आले आहेत.


 नियोजन बैठकीत शेतकऱ्यांना योग्य वाणाची निवड तसेच खते व बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी,
घरचे सोयाबीन बियाणे वापरावे,  बियाणाची उगवण क्षमता तपासून बियाण्यावर रासायनिक व जैविक बीज प्रक्रिया करूनच बीबीएफ यंत्राने पेरणी करावी. तसेच माती नमुना तपासणी करून जमीन आरोग्य पत्रिका नुसार खताचा वापर करून १० टक्के खताची बचत कशी करावी?  फळबाग लागवड, नॅडेप कंपोस्ट युनिट व व्हर्मिकंपोस्ट युनिट,
डीबीटीवर नाव नोंदणी व कागदपत्र अपलोड करणे ईत्यादी विषयी कृषी सहाय्यक  कैलास पवार यांनी मार्गदर्शन केले. 

सदर बैठकीला सरपंच सौ.रुपाली प्रशांत गाटे, उपसरपंच सौ.साधना भागवत मंडलिक, गावातील नागरिक,आनंद बबन गाटे,नामदेव सखाराम गाटे, शिवाजी माणिक गाटे, विकास अंबुरे  यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
 
Top