लोहारा , दि.२१
लोहारा पंचायत समितीच्या सभागृहात माजी पंतप्रधान कै. राजीव गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील, शहराध्यक्ष के.डी. पाटील, पंचायत समिती उपसभापती व्यंकट कोरे, युवक शहराध्यक्ष हरी लोखंडे, विठ्ठल वचने-पाटील, जेवळीचे ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय गाडेकर, कार्यालयीन अधिक्षक चौगुले आदी उपस्थित होते.