उमरगा, दि.२१ 
 शहरामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वञ निर्जंतुकीकरण करण्याकरिता   जंतुनाशकची फवारणी करण्यास प्रारंभ करण्यात आले असुन शिवसेनेच्या वतीने संपूर्ण शहरात फवारणी करण्यात येत आहे.

 उमरगा शहरात गेल्या काही  महिन्यांपासून कोरोना बाधित रुग्णाची संख्या  वाढली होती.  सध्या रुग्ण कमी होत असून   कोरोनाचा पुन्हा उद्रेक होऊ नये,याकरिता शुक्रवार दि.२१ मे रोजी शिवसेनेच्या वतीने   शहरात जंतुनाशक फवारणी करण्यास सुरुवात झाली आहे. उमरगा शहरातील आरोग्य नगर भागात याचा माजी खासदार प्रा.रवींद्र गायकवाड यांच्या हस्ते प्रारंभ  करण्यात आला.

यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले, युवानेते किरण गायकवाड, तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, माजी नगराध्यक्ष रजाक अत्तार, डॉ.उदय मोरे,बप्पा हराळकर, रणधीर पवार, विजयकुमार नागणे,उपतालुकाप्रमुख एन. डी. शिंदे,नगरसेवक संतोष सगर, बळी  सुरवसे,महावीर अण्णा कोराळे, बापू गायकवाड, सचिन जाधव,संदीप चव्हाण, योगेश तपसाळे,संदीप चौगुले,  प्रशांत पोचापुरे, शफी चौधरी,रमेश जाधव,ओम जगताप, आकाश मोरे,विकी शहापूरे,दौलत सुरवसे,पंकज जगताप,संदीप जगताप, रोहित पवार,मुर्तुजा मुंगले, आकाश  येणेंगुरे, बळीराम गायकवाड, राम बोधे,मारुती देवकर,तुषार चव्हाण आदी उपस्थित होते.
 
Top