जळकोट, दि.२१ : 
तुळजापूर  तालुक्यातील    आलियाबाद गावातील नागरिकांची  ग्रामपंचायत येथे प्राथमिक कोवीड टेस्ट करण्यात आली. ही तपासणी गुरुवारी करण्यात आली. 


गावात आगोदर सर्वांना सुचना देऊन सांगण्यात आले की,  कोणाला सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी काही त्रास होत असेल तर तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टराकडे जावुन  तपासणी करून घेण्याचे आवाहन  करण्यात आले होते. 

त्यानुसार आलियाबाद  याठिकाणी  २० जणांचे कोरोना टेस्ट करण्यात आले.  यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य  प्रकाश चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ विष्णू सातपुते, पोलीस पाटील शिवाजी चव्हाण, शिवाजी नाईक, विनायक चव्हाण, सुभाष पवार,किरण चव्हाण, राजाराम पवार आशा कार्यकर्ती रिषा चव्हाण आदीसह  नागरिक उपस्थित होते.
 
Top