उस्मानाबाद, दि. 20 : उस्मानाबाद जिल्हयात आज गुरुवार दि. 20 मे रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 449 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 11 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 799 जण बरे होवून घरी परतले आहेत.
जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 50 हजार 886 इतकी झाली आहे. यातील 45 हजार 3 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 1 हजार 151 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 4 हजार 732 जणांवर उपचार सुरु आहेत.