लोहारा दि.१४ :
 राष्ट्रवादी युवती काँग्रेस लोहारा तालुकाध्यक्षपदी अक्षता गगन माळवदकर यांची निवड करण्यात आली आहे.


 राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रवादी युवती प्रमुख मार्गदर्शक खा.सुप्रिया  सुळे, प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील, तसेच राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांच्या मान्यतेने उस्मानाबाद राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्षा दिपाली सुर्यवंशी यांनी अक्षता गगन माळवदकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती सेलच्या लोहारा तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचे धेय धोरण लक्षात घेऊन सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचा निर्धार नवनिर्वाचित तालुकाध्यक्षा अक्षता गगन माळवदकर यांनी व्यक्त केला.


  माळवदकर यांच्या निवडीचे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सुरेश बिराजदार, लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष नाना पाटील,राष्ट्रवादी महिला शहर अध्यक्ष सुलोचना लक्ष्मण रसाळ,शहर अध्यक्ष आयुब शेख,सुनील ठेले, राष्ट्रवादी विद्यार्थी तालुकाध्यक्ष पृथ्वीराज जगताप,बाळासाहेब लांडगे, जिल्हा कार्यकारणी सदस्य हाजी बाबा शेख,शरीफा सय्यद,निहाल मुजावर, हेमंत माळवदकर यांनी या निवडीबद्दल  अभिनंदन केले आहे.
 
Top