उस्मानाबाद,दि.४ :इकबाल मुल्ला
 तेर ता. उस्मानाबाद   येथील महाराष्ट्र संत विद्यालयातील आयसोलेशन सेंटरला भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे व भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाअध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर यांनी यांनी भेट देऊन रुग्णांची विचारपुस केली. 

यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाअध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर यांनी भेट देऊन पाहणी केली. येथिल रुग्णांसाठी आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी बेड  दिले आहेत. 

यावेळी तेरचे मंडळ अधिकारी तिर्थकर, तेरचे सरपंच नवनाथ नाईकवाडी, उपसरपंच मज्जिद मनियार, सदस्य रवी चोगुले, बापू नाईकवाडी, रुग्ण कल्यान समितीचे सदस्य जुनेद मोमीन, सुभाष कुलकर्णी, विठ्ठल लामतुरे, मुख्यध्यापक बळवंतराव, प्रविण साळुंके, आदी उपस्थित होते.
 
Top