तुळजापूर, दि. १० :
तुळजापूर शहरातील प्रभाग क्रमांक आठमध्ये चारशे कुटुंबांना कै. विश्वास कका इंगळे विचार मंच व उद्योजक ऋषिकेश मगर मित्रपरिवार यांच्या वतीने किराणा साहित्याचे किट वितरित करण्यात आले .
तुळजापूर शहरामध्ये कोरोना आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांची आर्थिक अडचण लक्षात घेऊन काँग्रेसचे युवक नेते रणजीत इंगळे, युवक नेते आनंद जगताप आणि उद्योजक ऋषिकेश मगर यांच्या प्रयत्नाने प्रभागातील चारशे कुटुंबांना किराणा साहित्याचे वितरण सोमवारी सकाळी बारा वाजता सुरू झाले.ते चार वाजेपर्यंत चारशे कुटुंबांना घरपोच साहित्य देण्यात आले.
यावेळी श्री तुळजाभवानी देवीच्या प्रतिमेचे पूजन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज पाटील यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी विश्वास इंगळे विचार मंच व ऋषिकेश मगर मित्रपरिवार यांच्या वतीने या आपत्तीच्या काळात तुळजापुरातील यात्रा व्यवसाय ठप्प झाल्यामुळे लोकांना उदरनिर्वाह करणे कठीण होऊन बसले आहे. ही अडचण समजुन घेऊन सदर प्रभागातील कुटुंबांना आम्ही हे किट वितरण करीत आहोत. अशी माहिती काँग्रेसचे युवक नेते रणजित इंगळे यांनी दिली. याप्रसंगी श्रीकांत धुमाळ, बिपिन शिंदे, कालिदास चिवचिवे, विलास इंगळे, सुदर्शन पांढरी आशोक फडकरी, लखन पेंदे, राजेंद्र भांजी, अनिल भांजी, अजित इंगळे, गोविंद लोंढे, संजय लोंढे यांची उपस्थिती होती.
प्रभाग क्रमांक आठ मधील नागरिकासाठी प्रभागाच्या नगरसेविका श्रीमती इंगळे यांनी सातत्याने मदत कार्य आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वयंस्फूर्तीने कार्य करीत आहेत.