तुळजापूर , दि.१०
शहरात लसीकरण केंद्र वाढवुन ४५ वर्षावरील नागरिकांना दुसरा डोस घेण्यासाठी लस उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपचे बाळासाहेब भोसले यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
४५ वर्षा वरील लाभार्थी नागरिकानी लसीचा पहिला डोस घेऊन ७ ते ८ आठवडे होऊन गेले आहेत.
त्या सर्वाना लसचा दूसरा डोस घेणे आवश्यक आहे.
सध्या लसीकरण केंद्रावर लसीची कमतरता असल्या कारणाने वय वर्ष ४५ च्या पुढील नागरिकांना याचा दूसरा डोस देण्यात अडचण निर्माण होत आहे.
तरी जिल्हाधिकारी यानी याप्रकरणी स्वत लक्ष घालून दोन दिवसात लसिकरण केंद्रावर लसीचा मुबलक पुरवठा करावा ,जेणेकरून ४५ वर्ष वरील नागरिकांना दूसरा डोस घेता येईल. अशी मागणी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तसेच तुळजापुर शहरात डोस घेण्यासाठी नागरिकांची वाढती संख्या पाहता एकाच ठिकाणी गर्दी होत आहे. त्यामुळे तुळजापुर शहरात चार लसीकरन केंद्र करण्याची मागणीही करण्यात आली आहे. निवेदनावर भाजप नेते बाळासाहेब भोसले यांची स्वाक्षरी आहे.