तुळजापूर,दि.१०
शहरातील १२४ भक्त निवासातील कोवीड केअर सेंटरमध्ये व्यवस्थेची जबाबदारी असलेल्या नगपालिका अधिका-यास कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल निलंबित का करण्यात येऊ नये अशी विचारणा करणारी
नोटीस बजावण्यात आल्याने कामचुकार कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
दरम्यान नोटीसीचा खुलासा २४ तासांच्या आत सादर करण्याचे निर्देश नगपालिकेचे मुख्याधिकारी यानी दिले आहेत.
शहरातील आठवडा बाजार भक्त निवास येथील १२४ कोवीड केअर सेंटर येथील सोयी सुविधाबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत. स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने घाणीचे साम्राज्य, पाणी पुरवठा याबाबत वारंवार तक्रारी करण्यात येत आहेत. मात्र याठिकाणी स्वच्छता, पीण्याचे पाणी, विद्युत व्यवस्था आदी मुलभुत सुविधा पुरवण्याची जबाबदारी असणा-या नगापालिकेचे कर्मचाऱ्यांच्या
निष्काळजीपणाचा फटका कोरोना रूग्णांना बसत आहे.
वास्तविक पाहता सबंधितानी १२४ भक्त निवास येथे थांबून स्वच्छता, पाणी पुरवठा व विद्युत व्यवस्था आदींची व्यवस्था पाहणे गरजेचे असताना ते नेहमीच गायब असल्याचा तक्रारी होत्या.
अखेर याप्रकरणी कोरोना कोवीड १९ च्या कालावधीत कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत आपत्ती व्यवस्थापन कायदा व महाराष्ट्र नगरपालिका नगर पंचायत औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ मधील कलम ७९ नुसार निलंबनाची कारवाई का करण्यात येऊ नये अशी विचारणा करणारी नोटीस शिवरत्न आतकरे यांना बजावण्यात आली आहे. चोविस तासांचा आत नोटीसीचा खुलासा करण्याचे निर्देश मुख्याधिकारी आशिष लोकरे यांनी दिले आहेत.