उस्मानाबाद, दि. १०
कोरोनाच्या जीवघेण्या संकट काळात ग्रामीण भागातील तरुणानी रुग्णालयात उपचार घेणा-या रुग्ण व नातेवाईक उपाशी राहु नये म्हणुन जेवणाचे डब्बे पोहच करण्याचा स्तुत्य उपक्रम गेल्या काही दिवसापासुन सुरु आहे. त्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
अविनाश शेरखाने व ग्रुपच्यावतीने दररोज २०० डबे, मनीषा वाघमारे रा. तडवळा हिच्यावतीने दररोज १०० डबे, आणि यांचे मित्रपरिवार यांच्याकडून गरजु लोकांना रोज जेवणाचे डबे उस्मानाबाद मधील शासकीय रूग्णालयात व लागेल त्या परीसरात पुरवितात.
कोरोना माहामारीच्या काळात सामाजिक बांधिलकी जोपासत ग्रामीण भागातील मनीषा वाघमारे, अविनाश शेरखाने व मित्रपरिवाराच्यावतीने कौतुकास्पद उपक्रम राबवित असल्याबद्दल सर्व मित्र परीवाराच्यावतीने सत्कार करण्यात आला.
मनीषा वाघमारे या दररोज शासकीय रूग्णालयात तडवळा या ग्रामीण भागातुन येऊन १०० डबे देतात, त्यांना हातभार म्हनून त्यांचे मिञ आठवडयातील एक दिवस डबे वाटपासाठी प्रत्येक पक्ष संघटनाच्या वतीने वाटुन घेतले आहे.
यावेळी उपस्थित मनीषा वाघमारे, अविनाश शेरखाने, डॉ. ऋतुराज पाटील, विशाल पाटील, निखिल बनसोडे, प्रसाद मुंडे, वैभव मोरे, युवराज राठोड, दत्ता सोकांडे, अक्षय ढोबळे आदि उपस्थित होते.