उस्मानाबाद, दि. 22  -  
फक्त अत्यावश्यक सेवा व वस्तूच्या पुरवठ्यासाठी ई कॉमर्स  सेवा देण्याची परवानगी, जिल्हाधिकारी कार्यालयाचे  स्पष्टीकरण. 


ई कॉमर्स सेवा बंद करण्याबाबत कोणतीही सुचना देण्यात आलेल्या नाहीत, जिल्हाधिकारी कार्यालयाचे आदेश दि. 14  एप्रिल रोजी नूसार  ई कॉमर्स अंतर्गत फक्त आत्यावश्यक सेवा व वस्तूंच्या पुरवठयास परवानगी राहील. ई कॉमर्स सेवा देणा-या सर्व व्यक्तींनी शासनाच्या नियमानूसार तात्काळ लसीकरण करून घ्यावे. या घरपोच सेवेच्या प्रक्रियेमध्ये  कोविड 19 च्या  प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे उल्लंघन केल्यास एक हजार रूपये  दंड आकारण्यात येईल. 


 अशा प्रकारे वारंवार उल्लंघन आढळून आल्यास कोविड 19 जोपर्यतंत साथरोग म्हणून अधिसुचित राहील तोपर्यंत संबंधित ई -  कॉमर्स सेवा अस्थापना चालू ठेवण्याची परवानगी रद्द करण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी जिल्हा प्रतिव्यवस्थापन प्राधिकरण उस्मानाबाद शिवकुमार स्वामी यांनी दि. 22 मे रोजी  आदेशीत केले आहे.


 
Top