लोहारा ,दि.२२: 
लोहारा शहरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुका यांच्यावतीने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून मदत नव्हे,तर कर्तव्य समजून कर्तव्य बजावणारे पोलीस अधिकारी ,कर्मचारी तसेच मजूर आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना सॅनिटायझर व मास्क वाटप करण्यात आले.

   
 सध्या कोरोनाच्या संसर्गाने राज्यासह ग्रामीण भागातील नागरिक हतबल झाले असून कोरोनाच्या संकटात आरोग्य, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन  जनजागृती करीत कर्तव्य पार पाडत आहेत.  अशा  संकटामध्ये मदत नव्हे कर्तव्य समजून राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुक्याच्या वतीने पोलीस प्रशासन  जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून गेल्या दोन दिवसापासून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकासह आदी ठिकाणी तटस्थ पहारा देत नागरिकांना विना कारण घरा बाहेर न  निघण्याचे आव्हान करीत कर्तव्य बजावत आहेत.

या संकट समयी  छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जनता कर्फ्यू मध्ये कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच गरीब गरजू मजूर तसेच आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुक्याच्या वतीने सॅनिटायझर व मास्क वाटप करण्यात आले आहे.

   
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक तालुकाध्यक्ष नाना पाटील, सामाजिक न्याय विभाग प्रदेश सरचिटणीस जालिंदर कोकणे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी अध्यक्ष शरीफा सय्यद, राष्ट्रवादी काँग्रेस युवती तालुकाध्यक्ष अक्षता गगन माळवदकर,  शहर अध्यक्ष आयुब हबीब शेख,  महिला आघाडी शहराध्यक्ष सुलोचना रसाळ, हाजी बाबा शेख, स्वप्नील माटे, राजपाल वाघमारे, रफिक गंजीवाले, पिंटू रसाळ, मिलिंद नागवंशी, सौदागर रणशूर,शिवा चपळे, गुंडू गोफणे, महेबुब मोमीन, अजीम बागवान सह आदींनी  सॅनिटायझर व मास्क वाटपात सहभागी झाले होते.
 
Top