काटी,दि.२२ : उमाजी गायकवाड
सध्या कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे सर्वञ ऑक्सिजनचा तुटवडा भासत असताना तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील तामलवाडीचे भूषण ठरणाऱ्या वैभव गिल्डा यांचा गोरज ऑक्सिजन प्लॅन्ट हा उस्मानाबाद जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरत आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात ऑक्सिजनची टंचाई भासू नये, यासाठी प्रशासनाच्या नियंत्रणाखाली तहसिलदार सौदागर तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्या निगराणीत ऑक्सिजन प्लॅन्टचे कर्मचारी अहोरात्र कम करून ऑक्सिजन निर्मिती करीत आहेत.
या पार्श्वभूमीवर तामलवाडी ग्रामस्थांच्या वतीने पंचायत समिती सदस्य दत्ता शिंदे, हणमंत गवळी, सुधाकर लोंढे, नागनाथ मसुते,चनाप्पा मसुते यांच्या पुढाकाराने महसूल प्रशासनाचे नायब तहसीलदार स्वामी, पोलीस प्रशासनाचे तामलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पंडित, ऑक्सिजन प्लॅन्टचे मालक वैभव गिल्डा, मॅनेजर संतोष कुरे, कर्मचारी हसन पठाण, रहेमान पटेल, अच्युत कोळी, हरि पिंपरे, नितेश खंडागळे, दस्तगीर पटेल, शहाबुद्दीन कोतवाल, विनय नरवडे यांचा गौरव करण्यात आले.
दत्ता शिंदे,पंचायत समिती सदस्य
तामलवाडी -
उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर येथील कर्मचारी ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये, यासाठी अहोरात्र काम करीत आहेत. या कामासाठी त्यांचा सन्मान करणे ही आमची नैतिक जबाबदारी असून तामलवाडी येथील गोरज ऑक्सिजन प्लॅन्ट हा तामलवाडीसह उस्मानाबाद जिल्ह्याचे भूषण असून उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी निश्चितच वरदायिनी ठरत आहे.