नळदुर्ग,दि.२२ :  
खरीप २०२०मध्ये झालेल्या नुकसानीपोटी शेतक-यांना तात्काळ पिक विमा देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने करण्यात आली आहे.

 खरीप २०२० मध्ये झालेल्या प्रचंड नुकसानापोटी हक्काचा पिक विमा उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतक-यांना मिळालाच नाही, ख़रीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना पिक विम्याच्या रक्कमेची नितांत गरज आहे.


त्यामुळे हक्काच्या पैश्यापासून शेतकऱ्यांना वंचित न ठेवता तात्काळ संबधित पिक विमा कंपन्यास शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विम्याची रक्कम वर्ग करण्याचे आदेश द्यावेत,कारण सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे सर्व बाजूने शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. ख़रीपाच्या तोंडावर पेरणीसाठी उसनवारी,खासगी सावकाराकडून पैसे घेतल्याशिवाय पर्याय नाही ,  त्यामुळे अशा संकटकाळात शेतकऱ्यांच्या हक्काची पिक विम्याची रक्कम त्यांना मिळावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने थेट राज्याचे कृषि सचिव  एकनाथ डवले  यांच्याकडे निवेदनाद्वारे मनसेचे जिल्हा सचिव ज्योतिबा   येडगे यांनी केली आहे.
 
Top