लोहारा,दि.२२ :
शुक्रवारी शहरांमध्ये मोकाट फिरणा-या ४० दुचाकीस्वारावर कोविड १९ चे उल्लंघन केल्या प्रकरणी दंडात्मक कारवाई करुन ८ हजार रुपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे.
या दंडात्मक कारवाईने विनाकारण फिरणा-याचे धाबे दणाणले आहे.
लोहारा पोलिसांच्या धडाकेबाज या कारवाईत शुक्रवार दि. २१ रोजी सकाळपासून भर उन्हात पोलीस निरीक्षक धरमसिंह चव्हाण , पोलीस उपनिरीक्षक आनंदराव वाठोरे यासह पोलिस कर्मचारीनी विनाकारण, विनामास्क, बाहेर फिरणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाईस सुरुवात केली.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मोटर सायकलवर फिरणारे दुचाकी धारकांकडून कोविड १९ चे उल्लंघन केल्याप्रकरणी दुपारपर्यंत २५ जणावर दंडात्मक कारवाई केली होती. तर दुपार नंतर १५ जणांवर कारवाई केल्याने एकूण ४० जणांवर कारवाई करीत ८ हजार रुपये या कारवाईतून प्राप्त झाले आहे.
सध्या कोरोनाचे प्रादुर्भाव वाढत असल्याने लोहारा पोलीस ठाण्याच्या वतीने विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना धडा शिकवण्यासाठी सदर मोहीम हाती घेण्यात आली. दुपार पर्यत पोलीस प्रशासनाच्या वतीने बाहेर फिरणाऱ्या दुचाकीस्वार तसेच चार चाकी वाहन यांची कसून चौकशी केली जात होती. यामुळे दुपारनंतर रस्त्यावर फिरणारे पुन्हा बाहेर फिरकले नाहीत.
शहरांमध्ये पोलिसाकडून दंडात्मक कारवाई केली जात असल्याने शहरात शुकशुकाट दिसून आले.
अशा दंडात्मक कारवाईमुळे नागरिकावर आळा बसेल असे विश्वास लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धरमसिंग चव्हाण व पोलीस उपनिरीक्षक आनंदराव वाठोरे यांनी बोलताना सांगितले.
या मोहिमेमध्ये पोलीस कर्मचारी एस .एस .पांचाळ, हनुमंत पापुलवार, अनिल बोडमंवाड, प्रशांत शेळवने, विजय कोळी, नागेश रजपूत, सचिन दशवंत, अविनाश जाधव, गुलजार खान पठाण, होमगार्ड बिलाल गवंडी, लिंबराज कटके, दत्ता लामतुरे अजमेर सिद्धकी आदींनी काम पाहिले.