खानापूर : बालाजी गायकवाड

काटगांव शिवारात सहा दिवसापूर्वी वीज पडल्याने 26 शेळ्या सह बारा वर्षीय मुलगा धर्मेंद्र हा मरण पावला होता त्या गरीब कुटुंबास नळदुर्ग पोलीस स्टेशन च्या वतीने मंगळवार दि. 11 मे रोजी इटकळ औट पोस्ट येथे 51 हजार रुपयाची रोख स्वरूपात मदत केली. 

मयत धर्मेंद्र कोळी यांचे वडील माशाप्पा दुर्गाप्पा कोळी यांना 30 हजार रूपये तर तारुबाई नागनाथ कांबळे यांना 21 हजार रुपये मदत केली.व या लॉक डाउन च्या काळात कोळी व कांबळे कुटुंबास पूर्ण राशन ही भरून देणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत यांनी प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले. 

धर्मेश हा मरगम्मा समाजातील गरीब कुटुंबातील आहे काटगांव येथील या दुर्घटनेत धर्मेश कोळी व त्याच्या 12 शेळ्या तर तारुबाई नागनाथ कांबळे  यांच्या 14  शेळ्या मृत्यूमुखी पडल्या खुपच दुर्दैवी घटना घडली त्यांना शासकीय मदत तर मिळेलच पण आपण ही समाजाचे काही तरी देणे आहोत हा भाव मनी ठेऊन उस्मानाबाद जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन ; अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पालवे व उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व पोलीस सहकारी व नळदुर्ग अंतर्गत पोलीस पाटील यांच्या सहकार्यातून व नळदुर्ग शहरातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या सहकार्यातून या कोळी व कांबळे परीवारास मदत केली असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत यांनी सांगितले.

यावेळी इटकळ औट पोस्टचे पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास जाधव,पोलीस कॉ.धनंजय वाघमारे, लक्ष्मण शिंदे, माजी सरपंच अझर मुजावर,पोलीस पाटील विनोद सलगरे,साधु माळी,मधुकर चव्हाण पत्रकार बांधव उपस्थित होते.नळदुर्ग पोलीस स्टेशन च्या वतीने या मरगमा समाजातील गरीब कुटुंबास 51 हजार रुपयाची मदत केल्याने गांव परिसरातून कौतुक केले जात आहे.

 
Top