वाशी, दि.  07 
वाशी पोलिस ठाणे येथील गु.र.क्र. 159 /2012 भा.दं.सं. कलम- 307, 452, 323, 34 या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक ए.डी. दराडे यांनी करुन गुन्ह्याचे दोषारोपपत्र सत्र न्यायालय, भुम येथे दाखल केले होते. 


या सत्र खटल्याचा निकाल सत्र न्यायाधिश उत्पात यांच्या न्यायालयात होवून दि. 07 मे  रोजी जाहिर झाला.
 आरोपी अशोक चांगदेव पवार  वय 27 वर्षे, अविनाश चांगदेव पवार, वय 25 वर्षे, दोघे रा. डोकेवाडी यांनी खुनाचा प्रयत्न केल्याप्ररकणी भा.दं.सं. कलम- 307 च्या उल्लंघनाबद्दल प्रत्येकी 5 वर्षे सश्रम कारावासासह 5 हजार दंडाची शिक्षा तर भा.दं.सं. कलम- 323, 34 च्या उल्लंघनाबाद्दल प्रत्येकी 6 महिने साध्याकारावासासह एक हजार दंडाची शिक्षा सुनावन्यात आली.
 
Top