उस्मानाबाद ,दि.७ ः
उस्मानाबाद जिल्हा: काल गुरुवार दि. 06 मे रोजी मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन यांच्या आदेशावरुन अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम करण्यात आली. या मोहिमेदरम्यान 17 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात आढळलेली 260 लि. गावठी दारु व देशी- विदेशी दारुच्या 49 बाटल्या जप्त करण्यात आल्या. जप्त मद्यार्काची एकत्रीत किंमत 18,366 ₹ आहे. यावरुन 17 व्यक्तींविरुध्द म.दा.का. अंतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 17 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
उस्मानाबाद (ग्रा.): राजेंद्र पवार, रा. गावसूद, ता. उस्मानाबाद हे आपल्या राहत्या घरासमोर 50 लि. गावठी दारु (किं.अं. 3,000 ₹) अवैधपणे बाळगलेले आढळले.
साहिल चंदनशिवे, रा. सोनेगाव रोड, येडशी हे आपल्या पत्रा शेडसमोर 12 लि. गावठी दारु (किं.अं. 610 ₹) अवैधपणे बाळगलेले आढळले.
तुळजापूर: नसरोद्दीन शेख, रा. पापनाश गल्ली, तुळजापूर हे वडार गल्ली येथील मोकळ्या जागेत 10 लि. गावठी दारु (किं.अं. 750 ₹) अवैधपणे बाळगलेले आढळले.
आनंदनगर: मंगल काळे, रा. शिवछत्रपती नगर, उस्मानाबाद या आपल्या राहत्या घरासमोर 20 लि. गावठी दारु (किं.अं. 820 ₹) अवैधपणे बाळगलेल्या आढळल्या.
आजमोद्दीन पठाण, रा. उपळा, ता. उस्मानाबाद हे आपल्या राहत्या घरासमोर 10 लि. गावठी दारु (किं.अं. 410 ₹) अवैधपणे बाळगलेले आढळले.
ढोकी: शिवाजी देशमुख, रा. तेर, ता. उस्मानाबाद हे तेर शिवाराती ‘हॉटेल येडेश्वरी’ च्या बाजूस देशी- विदेशी दारुच्या 26 बाटल्या (किं.अं. 1,880 ₹) अवैधपणे बाळगलेले आढळले.
शिवराम काळे, रा. दत्तनगर ढोकी, ता. उस्मानाबाद हे दत्तनगर पारधी पिढी येथे 15 लि. गावठी दारु (किं.अं. 950 ₹) अवैधपणे बाळगलेले असढळले.
नळदुर्ग: ललीता राठोड, रा. लोहगाव, ता. तुळजापूर या आपल्या राहत्या घरासमोर 13 लि. गावठी दारु (किं.अं. 880 ₹) अवैधपणे बाळगलेल्या आढळल्या.
जनार्दन शिंदे, रा. किलज, ता. तुळजापूर हे आपल्या शेताती गोठ्यासमोर रबरी नळीमध्ये 10 लि. गावठी दारु (किं.अं. 700 ₹) अवैधपणे बाळगलेले आढळले.
कैलास राठोड, ता. वत्सलानगर, अणदुर, ता. तुळजापूर हे आपल्या राहत्या घरासमोर 8 लि. गावठी दारु (किं.अं. 400 ₹) अवैधपणे बाळगलेले आढळले.
कळंब: भागुबाई पवार व निता काळे, दोघी रा. कळंब या दोघी आपापल्या राहत्या घरासमोर अनुक्रमे 19 लि. व 15 लि. गावठी दारु (एकुण किं.अं. 1,700 ₹) अवैधपणे बाळगलेल्या आढळल्या.
मुरुम: गोविंद कवटे, रा. नलवाडी, ता. उमरगा हे नलवाडी गाव शिवारात देशी दारुच्या 11 बाटल्या (किं.अं. 572 ₹) अवैधपणे बाळगलेले आढळले.
भुम: बबन काळे, रा. पारधी पिडी, भुम हे आपल्या राहत्या घरासमोर 18 लि. गावठी दारु (किं.अं. 1,820 ₹) अवैधपणे बाळगलेले आढळले.
आंबी: उज्वला सुतार, रा. तांदुळवाडी, ता. परंडा हे आपल्या घराबाजूच्या झाडाखाली देशी दारुच्या 12 बाटल्या (किं.अं. 624 ₹) अवैधपणे बाळगलेल्या आढळल्या.
उमरगा: रवी मुटले, रा. कुन्हाळी, ता. उमरगा हे आपल्या राहत्या घरासमोर 15 लि. गावठी दारु (किं.अं. 1,000 ₹) अवैधपणे बाळगलेले आढळले.
उस्मानाबाद (श.): तानाजी पवार, रा. इंदिरानगर, उस्मानाबाद हे इंदिरानगर येथे 45 लि. गावठी दारु (किं.अं. 2,250 ₹) अवैधपणे बाळगलेले आढळले.