तुळजापूर,दि.७:
जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शांकरराव गडाख यांच्या हस्ते शुक्रवार रोजी १२४ भक्तनिवास येथील कोविड रुग्णालयात मंदिर संस्थांच्या मदतीने सुरू केलेल्या १४५ ऑक्सिजन जोडणी खाटांचे लोकार्पण करण्यात आल्याचे पञाकाद्वारे सांगुन ५ सिलेंडर घेऊन १४५ ऑक्सिजन बेडचे उद्घाटन ? हे बरोबर नाही, असा आरोप नगराध्यक्ष सचिन रोचकरी यानी केला आहे.
आहे.
आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या पुढाकारातून १२४ भक्त निवासामध्ये कोविड सेंटर सुरु करण्यात आले होते, व पुढील गरज ओळखून गेल्या वर्षीच ऑक्सिजन पाईप लाईनच्या कामास सुरुवात केली होती. परंतु दिवाळी मध्ये कोरोना लाट ओसरल्याने प्रशासनाने या कामाकडे दुर्लक्ष केले व उर्वरित काम प्रलंबित राहिले. दुसऱ्या लाटे मध्ये ऑक्सिजन बेडची वाढती गरज लक्षात घेऊन प्रशासनाला सूचना देत काम पूर्ण करून घेतले.
उपजिल्हा रुग्णालयाकडे डॉक्टर्स कमी असल्याने तेरणा मेडिकल कॉलेज मधील डॉक्टर्सची सोय करून ठेवली,परंतु जिल्ह्यात ऑक्सिजन व सिलेंडर्स ची कमतरता असल्यामुळे १२४ भक्त निवासातील ऑक्सिजन बेड सुरु करण्यात आले नव्हते. परंतु केवळ सवंग प्रसिद्धीसाठी पुरेसे सिलेंडर व मुख्यतः पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध नसताना देखील १२४ भक्त निवास मधील ऑक्सिजन जोडणी केलेल्या १४५ खाटांचे लोकार्पण करण्यात आले.
सिलेंडर उपलब्ध नसताना देखील हा फार्स कशासाठी हा प्रश्न तुळजापूर वासियांच्या मनात निर्माण होत आहे.
यावेळी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा शल्यचिकीत्सक उपस्थित होते. पालकमंत्री महोदयांसह त्यांना देखील याबाबत विचारणा केली परंतु त्यांना याचे समाधानकारक उत्तर देता आले नाही. १४५ रुग्णांच्या ऑक्सिजनची सोय करण्यासाठी साधारणतः २०० जम्बो सिलेंडर्सची आवश्यकता आहे, मात्र केवळ १० सिलेंडर देऊन उदघाट्नाचा सोपस्कार उरकण्यात आला, त्यातील ५ सिलेंडर्स देखील तात्पुरत्या स्वरूपात उपजिल्हा रुग्णालयातील आणल्या आरोप रोचकरी यानी करुन पुढे म्हटले की, या १० सिलेंडर मध्ये फार तर ७ ते ८ रुग्णांनाच सौम्य प्रमाणात ऑक्सीजन मिळू शकतो. मग पालकमंत्री यांचे लोकार्पण का व कशासाठी हाच प्रश्न पडतो आहे.
ऑक्सिजन बेड्चे लोकार्पण झाले असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्यामुळे अनेक ऑक्सिजनची गरज असलेले रुग्ण भक्त निवास वर येतील, त्यांना काय सांगायचे हा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे किमान २०० सिलेंडर्स तातडीने उपलब्ध करून देण्याची नैतिक जबाबदारी पालकमंत्र्यांची आहे, व त्यांनी ते तातडीने उपलब्ध करून घ्यावेत,अशी आग्रही मागणी तुळजापूर वासियांच्या वतीने करण्यात येत असल्याचे नगराध्यक्ष. रोचकरीनी यानी सांगितले .