उस्मानाबाद, दि. 01 :  
संसर्गजन्य कोरोनाचा प्रादुर्भांव उस्मानाबाद जिल्ह्यात अधिक असल्याने दि. 15 जून रोजी पर्यंत म्हणजेच 15 दिवस निर्बंध लागू करण्यात आले आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवांची दुकाने 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी पूर्वीप्रमाणे देण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. कौस्तुभ दिवेगावकर यांनी सोमवार दि. 31 मे रोजी  आदेशीत केली आहे. 


 दि. 15 जून रोजी सकाळी सात वाजेपर्यंत निर्बंध लागू राहणार आहे. अत्यावश्यक सेवेत समावेश असलेली किराणा दुकाने, भाजीपाला, फळविक्री, दूध संकलन व वितरण, सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची दुकाने म्हणजेच बेकरी, मिठाई, चिकन, मटण, पोल्ट्री, मासे, अंडी विक्रीची दुकाने, पाळीव प्राण्यांच्या खाद्यांची दुकाने तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपालिका नगरपंचायत हद्दीच्या क्षेत्रात व हद्द संपल्यानंतर बाहेर दहा किलोमीटर अंतराच्या आतील असलेले सर्व पेट्रोल पंप हे केवळ सकाळी 7 ते 11 वाजण्याच्या दरम्यान सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच सर्व बँका डाक विभागाच्या सेवा दुपारी 2 पर्यंत नागरिकांसाठी सुरू ठेवता येतील. दोननंतर त्या बंद करून अंतर्गत कार्यालयीन कामकाज करता येईल.
प्रकारची किराणा दुकाने, भाजीपाला, फळविक्री, दूध संकलन व वितरण, सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची दुकाने म्हणजेच बेकरी, मिठाई, चिकन, मटण, पोल्ट्री, मासे, अंडी विक्रीची दुकाने, पाळीव प्राण्यांच्या खाद्यांची दुकाने तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपालिका नगरपंचायत हद्दीच्या क्षेत्रात व हद्द संपल्यानंतर बाहेर दहा किलोमीटर अंतराच्या आतील असलेले सर्व पेट्रोल पंप हे केवळ सकाळी 7 ते 11 वाजण्याच्या कालावधीत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर  सर्व बँका,  डाक विभागाच्या सेवा दुपारी २ पर्यंत नागरिकांसाठी सुरू ठेवण्यात येणार आहे. दुपारी 2 नंतर त्या बंद करून अंतर्गत कार्यालयीन कामकाज करता येईल.
 
Top