उस्मानाबाद, दि. 02 
 जिल्ह्यामध्ये दि. 3 जून 2021 रोजी 45 वर्षाच्या वरील नागरिकांना तसेच आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाइन वर्कर यांना  कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे. 

याकरिता जिल्ह्यामध्ये 3 जून 2021 रोजी ग्रामिण रुग्णालय सास्तूर, उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर आणि उपजिल्हा रुग्णालय कळंब या ठिकाणी लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले आहे. 

ज्या लाभार्थ्यांनी‍ कोव्हॅक्सिन पहिला डोस घेऊन किमान 28 दिवस पूर्ण झालेले आहेत, अश्याच लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात येणार आहे. लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड किंवा डोस घेतला त्या वेळेस नोंदवलेला ओळखपत्र सोबत बाळगावे.

 
Top