उस्मानाबाद, दि. 2
उस्मानाबाद जिल्हयातील रूईभर गावचे सुपूत्र तथा लघु व मध्यम मंत्रालय भारत सरकारचे अतिरिक्त विकास आयुक्त आनंद ज्ञानदेव शेरखाने वय 55 वर्ष यांचे अल्पशा अजाराने बुधवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान दिल्ली येथिल रूग्णालयात निधन झाले . त्यांच्या पश्चात वडिल , भाऊ ,वहिनी, पत्नी, एक मुलगा , एक मुलगी असा परिवार आहे.
आनंद शेरखाने हे सैन्य दलातील आधिकारी संजय शेरखाने यांचे बंधू तर कृषी अधिकारी हणमंत गायकवाड यांचे भाऊजी होत. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांचे मुळगाव असलेल्या रुईभर या गावावर शोककळा पसरली.