उस्मानाबाद, दि. 05 : उस्मानाबाद जिल्हयात आज शनिवार दि. 4 जून रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 177 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 2 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 314 जण बरे होवून घरी परतले आहेत.
जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 55 हजार 892 इतकी झाली आहे. यातील 52 हजार 720 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 1 हजार 272 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1 हजार 900 जणांवर उपचार सुरु आहेत.