पोलीस ठाणे, बेंबळी: रामेश्वर विठोबा सातपुते, रा. केशेगाव, ता. उस्मानाबाद हे दि. 01 जून रोजी केशेगाव शिवारातील आपल्या शेतात एका कॅनमध्ये 15 लि. गावठी दारु (किं.अं. 620 ₹) बाळगलेले तर दुसऱ्या घटनेत महेश शेषेराव वाघमोडे, रा. करजखेडा, ता. उस्मानाबाद हे याच दिवशी करजखेडा शिवारातील गारवा ढाब्याच्या बाजूला अवैध विक्रीच्या उद्देशाने देशी दारुच्या 10 बाटल्या (किं.अं. 520 ₹) बाळगलेले असलेले बेंबळी पो.ठा. च्या पथकास आढळले.

पोलीस ठाणे, उमरगा: जयराम नागनाथ सुरवसे, रा. त्रिकोळी, ता. उमरगा हे दि. 01 जून रोजी आपल्या राहत्या पत्रा शेडच्या बाजूला अवैध विक्रीच्या उद्देशाने एका पिशवीत देशी दारुच्या 9 बाटल्या (किं.अं. 540 ₹) बाळगलेले तर दुसऱ्या घटनेत गोविंद चव्हाण, शिवाजी ठवळे, विजयबाई सुर्यवंशी, तीघे रा. उमरगा, संजय राठोड, रा. पळसगांव तांडा असे चौघे याच दिवशी उमरगा येथील त्रिकोळी रस्त्यावरील एका पत्रा शेडमध्ये 5 कॅनमध्ये एकुण 30 लि. गावठी दारु (किं.अं. 2,100 ₹) बाळगलेले असलेले उमरगा पो.ठा. च्या पथकास आढळले.

            यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
Top