तुळजापूर दि २१ :

शारीरिक तंदुरुस्तीसाठी योगाभ्यास महत्त्वाचा आहे, मनाची प्रसन्नता देखील यामधून वृद्धिंगत होते त्यामुळे समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांनी योग अभ्यास करावा असे आवाहन कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कोरेकर यांनी केले.

कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग येथील एन.एस.एस, एन.सी.सी व  क्रीडा विभागाच्या वतीने  ऑनलाईन आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. 

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कोरेकर  यांनी योग केल्यामुळे होणारे फायदे सांगून शरीर आणि मन सक्षम आणि सुदृढ करण्यासाठी व्यक्तीला योगाची आवश्यकता आहे असे मत मांडले.

यानंतर क्रीडा विभागाचे प्रमुख डॉ. अशोक कांबळे व डॉ. कपिल सोनटक्के यांनी योगाचे महत्व आणि योगाची प्रात्यक्षिके करून दाखविली.

 या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. रामदास ढोकळे , नॅक समन्वयक डॉ. मनोज झाडे, डॉ. एस एस शिंदे, , प्रा. महेंद्र भालेराव, डॉ. संतोष पवार अधिक्षक श्री धनंजय पाटील प्रा. प्रशांत अमृतराव डॉ. एस एस राठोड, डॉ. यू एन भाले, डॉ. एच एम मिर्झा तसेच प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, स्वयंसेवक, कॅडेट, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. निलेश शेरे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार  डॉ. रोहिणी महिंद्रकर यांनी मानले.
 
Top